+91 86528 58194 info@amhisatarkar.com

About Us

साताऱ्याची महान परंपरा, संस्कार आणि आपलेपणा जपण्यासाठी “आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान” एक नवी सामाजिक सेवा सुरू करत आहे — विवाह सेवा (Matrimony Service).

साताऱ्याच्या पवित्र भूमीत जन्मलेले आपण अनेक कारणांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर शहरांमध्ये स्थायिक झालो आहोत. जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जात असताना आपल्या मुला-मुलींच्या योग्य विवाह जुळवणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात योग्य व विश्वासार्ह स्थळ शोधणे कठीण झाले आहे. यासाठीच सातारकर बांधवांना एकत्र आणून विश्वासार्ह, संस्कारी आणि पारदर्शक विवाह सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

आमच्या विवाह सेवेची वैशिष्ट्ये

  • सातारकर कुटुंबांना जोडणारी विश्वासार्ह व्यासपीठ
  • सुशिक्षित व संस्कारी मुला-मुलींची नोंदणी
  • कुटुंबीयांच्या अपेक्षा लक्षात घेऊन योग्य स्थळ सुचवणे
  • गोपनीयता आणि विश्वास याला प्राधान्य
  • समाजातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन

आमचे उद्दिष्ट

सातारकर समाजातील मुला-मुलींसाठी योग्य, संस्कारी व सुसंस्कृत कुटुंबात विवाह जुळवून देणे आणि समाजातील एकता, सहकार्य व आपुलकी वाढवणे.